पंचवीस वर्षानंतर सिद्धेश्वर हायस्कूलचे विद्यार्थी एकत्र

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : येथील सिद्धेश्वर हायस्कूल मध्ये २००१ साली दहावीच्या क तुकडीत शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या आणि विविध ठिकाणी स्थलांतरित विद्यार्थी आज आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात २५ वर्षानंतर एकत्र आले होते. 

रविवारी सिद्धेश्वर हायस्कूल मधील दहावीच्या क तुकडीच्या वर्गखोलीत आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक जी. बी. दौड, प्रमुख अतिथी निवृत्त क्रीडा शिक्षक एन. पी. दौड, पी. जि. सुरडकर, फुले आणि संतोष बोराडे आदी मार्गदर्शक उपस्थित होते. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीतानंतर आपआपल्या बाकड्यांवर बसून शालेय जीवनातील जुन्या आठवणीना उजाळा दिला.

निधन झालेल्या शिक्षक आणि वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करून उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. याप्रंगी उपस्थित वक्त्यांनी देखील मार्गदर्शन केले. स्नेह भोजनानंतर या कार्यक्रमाचा समारोप झाला.
 
या कार्यक्रमास २००१ च्या सालच्या दहावीच्या वर्गातील काकासाहेब घोडे, जगदीश साबळे, दत्ता वाघ, गणेश कळम, संतोष लुटे, कौतिक बकले, शालीवान सावंत, लक्ष्मण बकले, धनराज जाधव, प्रकाश बकले, रामदास गावंडे, देविदास फरकडे, ज्ञानेश्वर निकाळजे, जनार्धन साखळे, तुळशीराम कळम, धोंडीराम बकले, समाधान शिंदे, रवींद्र मोरे, मुकेश गिरणारे, दादाराव राउत, अप्पा आहेर, नंदा गाडेकर, ताई कळम, गंगा कळम, दुर्गा कळम, कमल रोठे, मंदा साखळे, ज्योती नरवणे, काशिगंगा कळम, राधा गावंडे, सुनिता पगारे, संगीता बकले, सरला कळम, यशोदा गायकवाड, मंगल हाके, सुनिता तुपे, आशा साखळे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक राधा रोठे आणि आभार प्रदर्शन बाळू कलम यांनी केले.